मराठी साहित्य व साहित्या सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे रंगले कविसंमेलन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भक्ती आणि हास्य रसाने सारस्वतांनी केली “नारायणी” ची सेवा

मराठी साहित्य व साहित्या सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे रंगले कविसंमेलन.

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर..

नवरात्रोत्सवात देवीची आराधना केली जाते. या दरम्यान व्रत-उपवास आणि आराधना याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ दिवस, देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. त्याच प्रकारे या नऊ दिवसांत देवीला प्रत्येक दिवशी नऊ विशेष भोग किंवा प्रसाद अर्पित केल्याने देवी सर्व प्रकाराच्या समस्यांपासून मुक्ती देते, ही सर्व भक्तांची धारणा आहे. सारस्वतांनी तयार केलेला विशेष भोग म्हणजे त्यांचं साहित्य. तेच विशेष भोग म्हणून त्यांच्या रचना देवीच्या चरणी अर्पण करण्याची नामी संधी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात साधली.

“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आठवे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिक अभिनेते रविंद्र शंकर पाटील हे अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या सुविद्य सौभाग्यवती मेघा देखील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या त्यांचे ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचं स्थान प्राप्त केलेले उद्योगपती रतन नवल टाटा तसेच “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांचे सदस्य विक्रांत लाळे यांचे वडील मारुती लाळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये स्नेहा संजय फदाले, अशोक भाई नार्वेकर, सुनिता पांडुरंग अनभुले, महेंद्र रामचंद्र पाटील, गौरी यशवंत पंडित, प्रतिक्षा संजय संखे, सरोज सुरेश गाजरे, सानिका ज्योतीकुमार कुपटे, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, किशोरी शंकर पाटील, कल्पना दिलीप मापूसकर, स्वाती हेमंतकुमार शिवशरण, प्रा. स्नेहा केसरकर, आश्विनी सोपान म्हात्रे, प्रमोदिनी अनिल देशमुख, जयश्री हेमचंद्र चुरी, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी नारायणीचा जागर करणार्‍या आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

 

मध्यंतरामध्ये चहा अल्पोपहारासोबत सुनिता अनभुले यांनी एकाच शब्दाला एकाच वाक्यात गुंफून शेर सादर करत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. किशोरी पाटील यांनी ‘अजीब दास्तां है’ ह्या गीताने वातावरण भारून टाकले. तसेच पूर्व संमेलनाध्यक्ष शैलेश निवाते यांनी त्यांनी रचना सादर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. “मराठी साहित्य व कला सेवा” चे संस्थापक अध्यक्ष तसेच पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांचा नुकताच लायन्स इंटरनॅशनल संस्थेकडून संपादकीय लिखाणासाठी सन्मान करण्यात आला. त्याच निमित्ताने प्रमोदिनी देशमुख यांनी त्यांचा भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार आवर्जून केला. बृहन्मुंबई महानगरपालिका विभागीय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त करणार्‍या बालकवी वेदान्त यशवंत पंडित याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन प्रमोदिनी देशमुख आणि वैभवी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या.

दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित मराठी विनोदी रचना सुंदररीत्या सादर केल्या आणि दादरच्या राजा शिवाजी विद्या संकुलामध्ये हास्याचे फवारे उडाले.

 

संमेलनाध्यक्ष रविंद्र शंकर पाटील यांनी सादर केलेल्या फसलेल्या प्रेमाच्या हास्य कवितेवर त्यांच्या पत्नीनेही मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी सर्वांना शुभेच्छा देताना मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या.

 

कार्यक्रमाचा आणि कवितांचा आनंद घेण्यासाठी बालकवी वेदान्त पंडित, साहित्यिका शितल चेंदवणकर, संजय संखे आवर्जून उपस्थित होते. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन अवधूत नार्वेकर आणि मेघा पाटील यांनी केले.

 

कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी “वेळेत येणाऱ्या” सारस्वतांना सन्मानित केले. आपण सार्‍यांनीच वेळेच भान बाळगावे ह्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. स्वाती शिवशरण, किशोरी पाटील, सानिका कुपटे, प्रा. स्नेहा केसरकर आणि अशोक भाई नार्वेकर ह्या पाच जणांचा सन्मान संमेलनाध्यक्षपद भूषवत असलेल्या रविंद्र पाटील यांच्या उपस्थित तसेच नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे ह्यापुढे सगळेच वेळ चोख पाळतील ही अपेक्षा करण्यास हरकत नाही. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

दीपावली निमित्त ९ नोव्हेंबर २०२४ (अंदाजित) रोजी नऊवे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा अभिनेते, गायक तसेच कवी/गीतकार महेंद्र रामचंद्र पाटील असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर तर आभारप्रदर्शन नितीन सुखदरे यांनी केले.

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रमोदिनी देशमुख, सुनिता अनभुले, शैलेश निवाते, नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग