24 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे,विजांच्या गडगडासह पाऊस …

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

24 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे,विजांच्या गडगडासह पाऊस  कोसळणार असल्याने

नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी, दि. 22 (जिमाका) : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून प्राप्त माहितीनुसार दि. 21 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील अनेक भागात वादळीवारे व विजांच्या गडगटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधित नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात येत आहे.*
*वीज कोसळण्यापूर्वी अशी घ्या काळजी -*
उंच झाडे, विजेचे खांब यासारख्या विजेचे सुवाहक असलेल्या वस्तूच्या खाली उभे राहू नका. विजेचा प्रकाश आणि आवाज यात 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्ही विजेच्या आवाक्यात आहात,तुम्हाला विजेपासून धोका आहे,तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ही 80% आहे.वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे,अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे. विजेचे अर्थिंग कायम कार्यरत ठेवा.
*वीज कोसळण्याच्या धोक्यापासून असा करा बचाव -*
विजा चमकत असताना घरात असल्यास कोणतेही विद्युत उपकरण चालू वा बंद करू नका अथवा हाताळू नका.जर गाडीमध्ये असाल व सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य नसेल तर गाडीमध्येच थांबा. काचा व इंजिन बंद करा व कोणत्याही धातूला स्पर्श करू नका.जर रिक्षा किंवा कापडी छताच्या गाडीत असाल तर बाहेर पड़ा व इमारतीचा आसरा घ्या. दारे-खिडक्यांपासून तसेच ओसरीपासून लांब रहा. रस्त्यावरील पत्र्याचे/धातूचे बसस्टॉप अथवा टपऱ्या असुरक्षित व अयोग्य ठिकाणी असतात त्याचा आसरा घेऊ नका.उंच झाडे, विजेचे खांब यासारख्या विजेचे सुवाहक असलेल्या वस्तूच्या खाली उभे राहू नका. वादळापूर्वी सर्व विद्युत उपकरणाचे स्वीच बंद करा आणि प्लग काढून टाका. चार्जर,फोन किंवा कोणतेही विद्युत उपकरण वापरू नका.खुल्या जागी असाल तर चेंडूच्या आकाराच्या स्थितीत बसा. झाडांजवळ किंवा झाडांखाली थांबू नका, वाहत्या पाण्यापासून दूर रहा. खुल्या जागी असाल तर एखाद्या वाहनात आसरा घ्या आणि मोबाईलचा वापर टाळा. मोटार,बस, आच्छादित वाहनात असाल तर त्यातच रहा.धातूच्या वस्तू वापरू नका, विजेच्या आणि दूरध्वनी जोडलाइन्सपासून लांब रहा.तलाव, सरोवरे किंवा नदीमध्ये बोटी घेवून जाऊ नका. डोंगराच्या टोकावर, खुल्या जागी किंवा समुद्रकिनाऱ्यावर थांबू नका.
*वीज पडून गेल्यानंतर ही काळजी घ्या-*
वीज कोसळल्यामुळे इजा झालेल्या व्यक्तीला स्पर्श करण्यात कोणताही धोका नसतो.इजा झालेल्या व्यक्तीचा श्वास सुरु आहे हे तपासा.विजेमुळे बाधितांवर गरज भासल्यास सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजे हृदय
कार्यान्वित करण्याचा बाहा उपाय द्या.तुटलेल्या विजेच्या तारा,झाडे यांकडे लक्षा द्या. त्यांची माहिती अधिकृत यंत्रणेला कळवा.तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.जिल्हा नियंत्रण कक्ष, रत्नागिरी 02352-222233 / 226248, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352 – 222222 / 112, जिल्हा परिषद नियंत्रण कक्ष – 02352- 350720 / 350727,तहसिल कार्यालय,राजापूर 02353 -222027, तहसिल कार्यालय, लांजा 02351 -295024,तहसिल कार्यालय,रत्नागिरी 02352- 223127, तहसिल कार्यालय, संगमेश्वर -02354- 260024, तहसिल कार्यालय,चिपळूण -02355 -252044, तहसिल कार्यालय, गुहागर – 02359 240237, तहसिल कार्यालय,खेड – 02356- 263031, तहसिल कार्यालय, दापोली -02358- 282036, तहसिल कार्यालय, मंडणगड – 02350-225236
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या.
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02352 – 226248 / 222233 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध   विरार - संदीप शेमणकर केंद्र...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा राजापूर- संदीप शेमणकर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला...
Read More
महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा

इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार

इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार बारामतीत पत्रकार परिषदेत सल्ला; कर्जमाफीच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचीही...
Read More
इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार

मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील

मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा  सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी -दापोली...
Read More
दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला  जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न  -रत्नागिरी...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी   ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध विरार - संदीप शेमणकर केंद्र व...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
Read More
शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या...
Read More
जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप