कुमारी राजवी रोहीलकर हिच्या वाढदिवसानिमित्त वेलदुर नवानगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप
.
गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेचे माजी विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल श्री भावेश रोहीलकर यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कुमारी राजवी रोहीलकर हिच्या वाढदिवसानिमित्त वेलदूर वानगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या पेन चे वाटप केले .त्यावेळी वेलदूर ग्रामपंचायतीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर जी कोळथरकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती आप्पा रोहिलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील , सावंत साहेब ,चव्हाण साहेब, अंजली मुद्दामवार ,धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते .त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल श्री भावेश रोहीलकर यांचा शाल श्रीफळ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या या युगामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून देणे गरजेचे आहे.नियमित वाचन करावे व विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपले स्वप्न साकार करावे .त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले.















