गणेश कदम निवडणूकीच्या रिंगणात..! डोंबिवली विधानसभा मतदार संघातून मराठा समाजाच्या वतीने भरणार अर्ज..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणेश कदम निवडणूकीच्या रिंगणात..!

गणेश कदम निवडणूकीच्या रिंगणात..! डोंबिवली विधानसभा मतदार संघातून मराठा समाजाच्या वतीने भरणार अर्ज..

आबलोली (संदेश कदम) .

विधानसभेच्या उमेदवारीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखती दिल्या आहेत. यात डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून गुहागर तालुक्यातील काताळे गावचे सुपुत्र गणेश कदम यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश जरांगें पाटील यांनी दिल्याने डोंबिवलीकरांना एक तरुण व आक्रमक चेहरा आमदार म्हणून निवडण्याची संधी मिळाली आहे.

 

रोखठोक आणि प्रेमळ व्यक्तीमत्व अशी गणेश कदम यांची ओळख असून समाजाच्या अनेक आंदोलनं, उपक्रम यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

 

अनेक आंदोलनं, उपोषणं करूनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसतील तर लोकशाही मार्गाने विधानसभेत जाऊन आवाज उठवने गरजेचे असल्याने निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगतले.

डोंबिवली विधानसभेतील मतदारांनी एकदा संधी दिल्यास आरक्षणाच्या मुद्याशिवाय इतर नागरी प्रश्नही सोडवण्यास त्याच जोशात काम करेन असा विश्वास गणेश कदम यांनी मतदारांना दिला व कोणतीही समस्या असल्यास त्यांच्या 8879776282 ह्या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Plz Join whatsup group 👇

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

Leave a Comment

आणखी वाचा...