स्वामी’ या संस्थे तर्फे कॅन्सर ग्रस्त रुग्णां सोबत दिवाळी साजरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘स्वामी’ या संस्थे तर्फे कॅन्सर ग्रस्त रुग्णां सोबत दिवाळी साजरी.

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘स्वामी’ ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत दिवाळीची एक आनंदी संध्याकाळ आणि फराळ वाटप”. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी शिरोडकर सभागृह, परळ, मुंबई येथे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह परगावाहून आलेल्या ३०० कॅन्सरग्रस्तरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळासोबत साडी, चटई, चादर, टॉवेल, साबण, तेल व पावडर इत्यादींचे वाटप एका सुंदर बॅगमधून करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोईवाडा पोलीस वरिष्ठ निरीक्षक सचिन कदम, श्रीपाद फाटक – अध्यक्ष अपना बाजार, क्षा. म. स. अध्यक्ष, उदय फणसेकर – क्षा. म. स. विश्वस्त, रोटरीयन सुरेंद्र भगत, नितिन कदम – समाजसेवक, दिलीपभाई जैन – समाजसेवक, बाबुभाई सोळंकी – समाजसेवक, शरद डिचोलकर – माजी अध्यक्ष, फेस्काॅम मुंबई , श्री खाडीलकर -विश्वस्त, नाना पालकर समिती तसेच ‘स्वामी’चे अध्यक्ष – सुरेश लाड, उपाध्यक्ष – वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष – मोहन कटारे, खजिनदार – उल्हास हरमळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेमक्या शब्दांची पखरण करत कौशल्यपूर्ण पद्घतीने सचिव – सुरेंद्र व्हटकर, सह-सचिव – साध्वी डोके यांनी केले.

 

कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोरंजनासाठी स्वामीच्या विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राचा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे संयोजन विमल माळोदे, प्रतिभा सावंत, गीता नाडकर्णी, प्रदीप ढगे यांनी केले तर खुमासदार सूत्रसंचालन अनिल तावडे यांनी केले. तालबद्ध वाद्यवृंदाची जबाबदारी हार्मोनियमवर दत्ताराम घाडी, नंदकुमार आरोंदेकर, संतोष घाडी, ढोलकीपटू दिलीप मेस्त्री, शैलेश तुम्मा, तालवाद्य शिवाजी गावकर यांनी सांभाळली. तर उपस्थितांना शुभदा मोरे, शैलजा काळे, सुनिता पारकर, वंदना भाटवडेकर, प्रतिभा मेस्त्री, मंदा कणेरकर, गणेश करलकर, कांतीलाल परमार, दिलीप मेस्त्री, सुरेश पवार ,भरत कस्तुर, अशोक अंबुर्ले यांनी आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले.

 

सभागृहात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मनमोहक रांगोळी आभा व्हटकर आणि रश्मी नाईक यांनी साकारली होती. पाहुण्यांचे स्वागत रचना खुळे, नितीन तांबे, निलेश पाठारे, विलास पाटील ह्यांनी केले.

 

रुग्णांची नावनोंदणी करण्यासाठी सुमंगल गुरव, सिध्दी परब, नम्रता पडवळ तत्पर होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था वैशाली ढोलम, ममता खेडेकर, गोविंद राणे, विष्णू मणियार, प्रतिभा सपकाळ, प्रियांका गायकर, लखबीर कौर, नम्रता व्हटकर, योगिनी लाड, गीतांजली करलकर यांनी चोख सांभाळली.

 

दीपावलीचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विश्वस्त गोविंद राणे, रचना खुळे, प्रतिभा सावंत, सल्लागार गजानन माटे, किरण करलकर, उदय पारकर, तृप्ती पवार, उर्मिला जाधव, तसेच प्रकल्प प्रमुख – मातृभाव- विमल माळोदे, प्रतिभा सपकाळे, रुग्ण साह्य केंद्र-नितीन तांबे, शिवाजी गावकर, दिवाळी धमाका वैशाली ढोलम, ममता खेडेकर, पॅथॉलॉजी-रश्मी नाईक, विद्यार्थी सहाय्य योजना नम्रता व्हटकर, गीता नाडकर्णी तसेच प्रतिभा सावंत, हिरेश चौधरी, गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के