केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला सज्ज  होण्याचे  निर्देश.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला सज्ज  होण्याचे  निर्देश..!

आबलोली (संदेश कदम) …

रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे.रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत तसेच महायुतीची सत्त्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व आणि राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद तसेच ४ महामंडळ अध्यक्ष पदे आणि महामंडळ संचालक पदे जिल्हा तालुका शासकीय कमिटी सदस्य पदे तसेच महापालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे महायुती द्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दीले आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी; दलितांच्या विकासासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला सारून नव्या दमाने भाजप शिवसेना रिपाइं राष्ट्रवादी महायुती ला विजयी करण्यासाठी प्रचाराला सज्ज व्हावे असे जाहीर आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदास आठवले यांनी केले.

मुंबईत बांद्रा येथील नाम.रामदास आठवले यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सुरेश बार्शिंग; दयाळ बहादुर ; विवेक पवार;घनश्याम चिरनकर आदी. अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून धारावी मतदारसंघ आणि भाजप च्या कोट्यातून कालिना हे मुंबईतील दोन मतदार संघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आले आहेत.त्या बाबतची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेत नाम.रामदास आठवले यांनी केली.महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दिले आहे. त्यामूळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी दूर सारून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी सज्ज राहावे आणि प्रचार करावा असे जाहीर आवाहन नाम. रामदास आठवले यांनी केले आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के