विरोधी पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने घेतला निर्णय,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश

 

विरोधी पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने घेतला निर्णय

 

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आज यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उद्यापर्यंत पाठवा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत.

 

रश्मी शुक्ला यांची कारकिर्द वादात होती. फोन टॅपिंगमुळे विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले होते. मुदत संपूनही रश्मी शुक्ला यांना २ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. याबाबत विरोधकांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात निष्पक्षपणे निवडणूक पार पडणार नाहीत असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

 

नाना पटोले काय म्हणाले?

 

रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले असले तरी निवडणूक प्रक्रियेत त्या सहभागी होणार नाहीत याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदावर बसून भाजपाला पाठिंबा देणाऱ्या य अधिकारी होत्या. विरोधकांचे फोन टॅपिंग केले जात होते. निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना या पदावर बसवलं होते. निवडणूक आयोगाकडे आम्ही याबाबत तक्रार केली होती. झारखंड, पश्चिम बंगाल याठिकाणी महासंचालक बदलले मात्र इतका वेळ निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला का लागला हा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

 

संजय राऊतांनीही केले होते आरोप

 

केंद्रीय गृहमंत्री राज्यांमध्ये फिरून आपण कसे जिंकणार, याची तयारी करत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी. राज्यात ज्या पद्धतीने गुंडशाही सुरू आहे त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी देशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना केली होती. सध्या घडीला पोलीस यंत्रणा राजकीय कामाला झोपली आहे एका पक्षाच्या कामाला जंपली आहे. त्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही. हा आमचा अंदाज होता तो आता खरा होताना दिसत आहे असं संजय राऊतांनी केला होता.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई