स्वीप उपक्रमा अंतर्गत रांगोळी प्रदर्शनातून प्राथमिक शिक्षकानी केली मतदार जनजागृती
गुहागर (वार्ताहर)-गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रायचंद गळवे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे, शिक्षण विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालशेत येथे गुहागर तालुक्यातील शिक्षकानी भव्य रांगोळी दालन उभारून स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती करून सर्व नागरिकांचे लक्ष वेधले.मतदानाची टक्केवारी वाढावी, नव मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निपक्षपातीपणे मतदान करणेबाबत व मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा ही घेण्यात आली .तसेच मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी संदेश देणारी भव्य रांगोळीचे कला दालन उभारून सर्व शिक्षकानी रांगोळी काढून मतदार जनजागृती केली आहे .सदर रांगोळी प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी गुहागर तालुका अपंग शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम ,तंत्रस्नेही शिक्षक श्री प्रताप देसले ,अखिल प्राथमिक शिक्षक संघटना शाखा गुहागरचे अध्यक्ष मनोज पाटील, प्राथमिक शिक्षक संघ शाखा गुहागरचे अध्यक्ष रवींद्र कुळे ,शिक्षक समितीचे माजी सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, आदर्श शिक्षक व तज्ञ मार्गदर्शक दिनेश जागकर आदी मान्यवर उपस्थित होते .264 गुहागर विधानसभा मतदारसंघातील नव मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अतिशय सुबक व प्रेरणादायी रांगोळी काढणाऱ्या सर्व कलाकार शिक्षक बांधवांचे गुहागर तालुका शिक्षण प्रशासनाकडून तसेच सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.