पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी!

 

    AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years : नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदीच्या घातक गोलंदाजीनंतर पाकिस्तानने दमदार फलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने २६.५ षटकांत केवळ २ विकेट्स गमावून सामना जिंकला. या विजयासह पाकिस्तानने २२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी मालिकेत २-१ ने धूळ चारली.*

 

मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला होता, पण त्यानंतर पाकिस्तानने पलटवार करत दोन्ही सामने जिंकून इतिहास रचला. दुसरा एकदिवसीय सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पाकिस्तानच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर ढेपाळलेले दिसले. या सामन्यात पाकिस्तानने ९ गडी राखून शानदार विजय नोंदवला होता. आता तिसरा सामना जिंकून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मोठा पराक्रम केला आहे.

 

WINNERS ????

 

A memorable ODI series win recorded in Australia ????#AUSvPAK pic.twitter.com/WbwUQJ895p

 

— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 10, 2024

 

पाकिस्तान क्रिकेट संघ २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. २००२ मध्ये पाकिस्तानने शेवटच्या वेळी हा पराक्रम केला होता. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा विजय पाकिस्तानी संघासाठी बळ देणारा ठरणार आहे. याशिवाय मोहम्मद रिझवाननेही आपल्या कर्णधारपदात दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच रिझवानची पाकिस्तानी संघात नियुक्ती झाली होती. नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १४० धावांवर गारद झाला.

 

पाकिस्तानकडून नसीम आणि शाहीनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. नसीम थोडा महागडा ठरला असला तरी त्याची गोलंदाजी प्रभावी ठरली. नसीम आणि शाहीन व्यतिरिक्त हरिस रौफनेही पाकिस्तानसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. हरिस रौफने ७ षटकात केवळ २४ धावा देत दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. यादरम्यान रौफने मालिकेत तिसऱ्यांदा ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. हरिस रौफने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण १० विकेट घेतल्या, ज्यामुळे तो मालिकावीर ठरला.

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानची गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीही उत्कृष्ट राहिली. पाकिस्तानसाठी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुब यांच्यात पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भक्कम भागीदारी झाली. पाकिस्तानकडून सॅम अयुबने ५२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. याशिवाय शफीकने ५३ चेंडूत ३७ धावा केल्या, तर बाबर आझम २८ धावांवर नाबाद राहिला आणि मोहम्मद रिझवान ३० धावांवर नाबाद राहिला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय
Play sound