महायुतीच्या राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन (आठवले) पक्ष उतरला मैदानात..!
आबलोली (संदेश कदम) …
गुहागर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या रिपब्लिकन पक्षाची बैठक गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मधील गुहागर बाजार येथील लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात 264 गुहागर विधानसभा 2024 या निवडणुकीत गुहागर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, नामदार रामदासजी आठवले यांचा आदेश या विषयावर रिपब्लिकन पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष श्री. संदिप कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले) तालुका गुहागर या पक्षाच्या बेसीक, युवक आणि गुहागर तालुका सोशल मीडिया व आयटी सेल पदाधिकारी यांचे समवेत प्रचार नियोजन बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीत राष्ट्रीय नेते, नाम. रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार स्वर्गीय आमदार रामभाऊ बेंडल यांचे सुपूत्र माजी सभापती, माजी नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन पक्ष (आठवले) अग्रस्थानी राहणार असून राजेश बेंडल यांच्या धनुष्यबाण निषाणी वरील विजयात रिपब्लिकन मतांचा सिंहाचा वाटा असून गुहागर तालुक्यातील रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे वतीने जिल्हा उपाध्यक्ष विजू आप्पा कदम, जिल्हा सदस्य मारुती मोहिते, गुहागर तालुका अध्यक्ष संदिप कदम, तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव, तालुका चिटणीस दशरथ पवार, तालुका सरचिटणीस सुनिल गमरे, तालुका संघटक आणि जेष्ठ मार्गदर्शक भिमसेन सावंत, तालुका प्रवक्ता शशिकांत जाधव, तालुका युवक अध्यक्ष आणि युवकांचे प्रेरणास्थान विजय असगोलकर,सचिन मोहिते, तसेच सोशल मीडिया व आयटी सेलचे गुहागर तालुका अध्यक्ष संदेश कदम आदी. पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हि बैठक उत्साहात संपन्न झाली
या बैठकीत असा निर्धार करण्यात आला की, शिवसेना, भाजपा,आर.पी.आय.( आठवले), राष्ट्रवादी (अजित पवार), आणि बळीराज सेना आदी. महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या धनुष्यबाण निषाणीवरच मतदारांनी शिक्का मारुन गुहागर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आणणारच असा निर्धार रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या युवक, बेसिक आणि सोशल मीडिया व आयटी सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या राजेश बेंडल यांच्या प्रचारात उतरले असून गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल हेच विक्रमी मतांनी निवडून येतील यासाठी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक वाडी – वाडीत घरा – घरात पोहचले असून महायुतीच्या राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन (आठवले) पक्ष उतरला मैदानात..!