स्वीप अंतर्गत पालशेत येथे पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती ….मतदान करण्यासाठी केले नागरिकांना आवाहन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर – (वार्ताहर). विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 264 गुहागर विधानसभा मतदार संघा अंतर्गत स्वीप उपक्रमा अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी केशव शिरसागर, केंद्र संचालक नामदेव लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी पालशेत येथे पथनाट्याद्वारे मतदारांना मतदान आवाहन मतदान विषयक जनजागृती केली .नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून स्वातंत्र्यपूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या दबावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे म्हणून सदर पथनाट्यातून पालशेत या ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले .पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन तुषार लोहार यांनी केले . दोन पथनाट्यामध्ये तुषार लोहार, विनोद कदम ,श्रीराम चव्हाण ,अक्षय ललोखंडे, योगेश चिडे ,विशाल पवार, रूपाली पठारे, विशाखा पवार, आरती नरके ,पूजा मेत्रे ,अर्जुन किन्हाळकर ,कुलदीप शरणागत, राहुल सातपुते ,अर्जुन सावंत, अविनाश ढवळे ,चितळे सर ,संगीता फराड, अंजुम शेख ,सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे ,सोनाली गायकवाड ,स्वाती गणेशकर आदी कलाकारांनी सक्रिय भाग घेऊन मतदारांना मत देण्याबाबत साद घातली.सदर प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, पंचायत समिती विषय शिक्षक साखरे सर, गुहागर तालुका अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, गुहागर तालुका अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे माजी सरचिटणीस नरेंद्र देवळेकर ,शिक्षक संघ गुहागर तालुकाचे अध्यक्ष रवींद्र कुळे ,आदर्श शिक्षक दिनेश जागकर ,तंत्रस्नेही शिक्षक प्रताप देसले, बाबासाहेब राशिनकर व नागरिक तसेच गुहागर तालुक्यातील सर्व नवनियुक्त शिक्षक उपस्थित होते .पथनाट्यातून मतदान जागृती केल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...