तळवली हायस्कूलमध्ये मतदार जनजागृतीसाठी मानवी साखळी.
तळवली (मंगेश जाधव)…
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेत स्विप अंतर्गत विधानसभा निवडणुक 2024 …. मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली.
या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम ए थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही देशामध्ये प्रत्येक प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क दिला जातो. मात्र सगळेच लोक त्याविषयी जागृत असतातच असे नाही. अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः ही जागृत असले पाहिजे तसेच आपल्या घरातील, शेजारील,वाडीतील व गावातील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे. असे मत व्यक्त केले. तसेच प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री देवरुखकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना आपल्याला भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे.तो प्रत्येकांने बजावला पाहिजे. असे सांगून मतदानाचा हक्क,त्याचे महत्त्व,याविषयी जनजागृती कशी करावी…?या विषयी जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी माहिती दिली.
स्विप अंतर्गत विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. विविध आकार, रचना करुन मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.त्यासाठी श्री. देवरुखकर सर, श्री.गवळी सर,श्री.गुरसळे सर, श्री. पुनस्कर सर व सौ. कांबळे मॅडम यांनी सहकार्य केले.*