गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,
अजिजा अब्दुल्लाह पूर्व प्राथमिक शाळा खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये “बालदिन” उत्साहात साजरा.
▫️ मिकी माऊस – सादरीकरणाने बाल सवंगडी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
चिपळूण –(योगेश पेढांबकर):-
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,अजिजा अब्दुल्लाह पूर्व प्राथमिक शाळा व खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये *”बालदिन* उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.इरफान शेख यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाला विद्यालयातील इयत्ता -९ वीतील विद्यार्थिनींनी सूत्रसंचलन केले.
मुलांचे हक्क, शिक्षण,आणि उज्ज्वल भविष्यासाठी हा दिवस समर्पित असतो. हा दिवस आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूंची आठवण करून देतो. ज्यांना आपण सारेजण प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणतो. मुले हे देशाचे भविष्य आहेत, त्यांची स्वप्ने आपण साकार करू शकलो तर आपल्या देशाचे भविष्यही तितकेच उज्ज्वल होईल, असा विश्वास चाचा नेहरु यांनी व्यक्त केला होता. अशा शब्दात विद्यालयातील शिक्षिका सौ.नाझिमा शेख यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
त्यानंतर विद्यालयातील अनुक्रमे कु. मंतशा खोत, कु. हुदा खतीब, इयत्ता -८ वी,तसेच कु. सिद्रा वांगडे इयत्ता – ७वी या विद्यार्थ्यांनी १४ नोव्हेंबर बालदिन याविषयी भाषण केले. त्यानंतर इयत्ता -८ वी च्या विद्यार्थिनींनी सुमधुर गीत सादरीकरण केले.यासाठी शिक्षिका सौ.मुस्कान मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच शालेय भित्तीपत्रके तयार केलेली कात्रणे काचफलकात लावण्यात आली.
त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक श्री.योगेश पेढांबकर यांनी आभार प्रदर्शन करतेवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व यावेळी
पंडित नेहरूंच्या मुलांबद्दलच्या विशेष प्रेमामुळे, ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते, म्हणून मुले त्यांना ‘ *चाचा नेहरू*’ म्हणत असत.
*’मुले बागेतील कळ्यांसारखी असतात ज्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे.* कारण तेच देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक आहेत.’ अशा शब्दात बसलेल्या विद्यार्थ्याना प्रबोधित केले.
यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरूसा खतीब,मुख्याध्यापक श्री.इरफान शेख,कलाशिक्षक श्री.उदय मांडे,कार्यक्रम नियोजन प्रमुख श्री.योगेश पेढांबकर, श्री.संदेश कुळे तसेच शिक्षिका सौ.मुस्कान मॅडम, तसेच सर्व शिक्ष