वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये बालदिन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा.
गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी येथे आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती म्हणजे बालदिन आनंदात साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील ,शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार ,धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला, अर्णवी नाटेकर ,आर्या नाटेकर ,काव्या दाभोळकर अनिश पालशेतकर सर्व विद्यार्थी उपस्थित होते .आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता सहावीचा विद्यार्थी अनिश पालशेतकर याने भूषवले. शाळेचे मुख्याध्यापक माननीय मनोज पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मुद्दमवार मॅडम यांनीही बाल दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. मुल्ला मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बाल दिन व चाचा नेहरू यांची माहिती सांगितली. गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना 14 नोव्हेंबर बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती सांगितली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या नाटेकर हिने केले व आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्णवी नाटेकर हिने केले. बाल दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक माननीय मनोज पाटील सर यांच्यामार्फत खाऊ वाटप करण्यात आले