मतदान जनजागृती साठी पथनाट्य रांगोळी मॅरेथॉन स्पर्धा व पायी रॅली चे आयोजन … 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मम्मी पप्पा आजी आजोबा माझा हट्ट पूर्ण करा..मतदान नक्की करा

पाल्यांचे मतदान करण्यासाठी पालकांना पत्र… 

मतदान जनजागृती साठी पथनाट्य रांगोळी मॅरेथॉन स्पर्धा व पायी रॅली चे आयोजन … 

– शिक्षण विभागाचा पुढाकार …निवडणूक निर्णय अधिकारी ,सहाय्यक निवडणूक अधिकारी ,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक ,माध्यमिक ,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान विषयक विविध माध्यमातून जनजागृती सुरू केलेली आहे .264 गुहागर विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदान होण्यासाठी लोक जागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहिताना ,अजून पर्यंत तुम्ही माझे सर्व लाड पूर्ण केले आहेत, मीही तुमच्या शब्दाप्रमाणे अभ्यास करतो.परंतु आज मी तुमच्याकडून शब्द घेणार आहे, मतदान करण्याचा माझा हट्ट पुरवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, भारत हा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे .माझ्या व आपणा सर्वांच्या भारतीयांच्या उज्वल भविष्यासाठी आपण तत्परतेने 20 नोव्हेंबर रोजी घराबाहेर पडून मतदान करा व आपले कर्तव्य पार पाडा असे पत्र लिहून भावनिक साद घालत पाल्यांनी आपल्या पालकांमध्ये मतदान जागृती केली.गुहागर तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य ,रांगोळी स्पर्धा ,मॅरेथॉन स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा ,पायी रॅली यांचे माध्यमातून मतदान जनजागृती केली, कौटुंबिक पत्र लेखनाद्वारे विद्यार्थी आई-वडिलांना घरातच समक्ष पत्र देऊन मतदान करणे बाबत भावनिक आवाहन करत आहेत.लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी सर्व प्रौढ नागरिकांनी मतदान करणे ही काळाची गरज आहे.आपले मत लोकशाहीचा प्राण आहे, ही बाब सर्व प्रौढ नागरिकांमध्ये विद्यार्थ्यां मार्फत बिंबवण्यात येत .गुहागर तालुक्यातील विविध शिक्षण प्रशालेमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मतदार जागृती विषयक मास्टर चित्रकला प्रश्नमंजुषा स्पर्धा ,12 नोव्हेंबर रोजी मानवी साखळी, 13 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्र संकल्पना पत्र, 14 नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा रांगोळी स्पर्धा, 16 नोव्हेंबर रोजी पायी रॅली ,सायकल रॅली ,बाईक रॅली ,पथनाट्य यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले .महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती पर उपक्रम स्वीप कार्यक्रमांतर्गत राबवण्यात बाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत .मतदार जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभाग हा आघाडीवर असून ठीक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे मतदार शपथ घेण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.निवडणूक गीते सादर करून मतदानाचे महत्त्व सांगण्यात आलेल्या आहे.शिक्षण विभागामार्फत बाजारपेठेत व महत्त्वाच्या ठिकाणी पथनाट्य सादर करून मतदानाची गरज पटवून देण्यात आलेली आहे .तसेच मतदानाचे फायदे व मत न दिल्याने होणारे नुकसान हेही समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.विद्यार्थ्यां मार्फत पालकांना पत्र लिहून मतदानाचे महत्त्व पटविण्यात आलेल्या आहे.तसेच पालकांचे मत हे मुलांच्या भविष्यासाठी असल्याचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे व घराघरातून मतदानाला प्रोत्साहन मिळण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे गुहागर तालुक्यात ठीक ठिकाणी शिक्षण संस्था मार्फत रांगोळी स्पर्धा ,मॅरेथॉन स्पर्धा, पायी रॅली बाईक रॅली, मतदान विषयक पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam