महिला उद्योजिका मोहिनी पुजारी यांना “मणिकर्णिका अवार्ड २०२४” स्टार्टअप सन्मान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महिला उद्योजिका मोहिनी पुजारी यांना “मणिकर्णिका अवार्ड २०२४” स्टार्टअप सन्मान

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : व्ही केअर वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) ही एक सामाजिक संस्था असून गेल्या १३ वर्षापासून शैक्षणिक क्रीडा, बेरोजगारी, वैद्यकीय, अपंगत्व आणि समाजातील अनेक घटकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. गेल्या १३ वर्षात व्ही केअर वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) तर्फे रुग्णांना वैद्यकीय मदत, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय सुरू करून देणे इत्यादी उपक्रम राबवित असून या संस्थेच्या माध्यमातून पार पडलेल्या “मणिकर्णिका अवॉर्ड २०२४” स्टार्टअप महिला उद्योजिका म्हणून मोहिनी पुजारी यांचा सन्मान करण्यात आला.

स्टे-फाइन फॅमिलीच्या ३ वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश आल्यामुळे आज कंपनीच्या संचालिका मोहिनी पूजारी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज “नारी प्रोटेक्ट ॲनिअन सॅनिटरी नॅपकिन” ब्रांडमुळे हा मानाचा महिला उद्योजकांचा सन्मान एकूण २ हजार ८७० महिला नामांकनातून टॉप ३० महिला उद्योजिकांमध्ये समावेश होऊन “मणिकर्णिका अवार्ड २०२४ ” स्टार्टअप महिला उद्योजिका म्हणुन प्रिन्स “क्राऊन” सोबत सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते मोहिनी पुजारी सन्मानित करण्यात आले.

सन्मान सोहळ्यात आपले मनोगत मांडताना मोहिनी पुजारी यांनी “मणिकर्णिका २०२४” या मिळालेल्या सन्मानाबद्दल संपूर्ण स्टेफाईन फॅमिलीचे आभार मानले आहेत. आजपर्यंत एक लाखापेक्षा जास्त महिलांसाठी कॅन्सरमुक्त महिला, प्लास्टिकमुक्त सॅनिटरी नॅपकिन तसेच महिलांसाठी स्वावलंबी अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचता आले. जवळ-जवळ १५००० पेक्षा जास्त महिलांना स्वयं व्यावसायिक बनविण्यात मोठे यश प्राप्त झाले. आपल्या या यशामध्ये सोबत काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुढे स्टेफाईनचे घोषवाक्य “स्टेफाईन की नारी, सब पे भारी!!” असे उदगार काढून त्यांनी यापुढे सुद्धा आपल्या सहकाऱ्यांसोबत अनेक शिखरे यशस्वीपणे गाठणार असल्याचे सूचक विधान केले.

आज समाजातील असाच एक घटक म्हणजेच महिला उद्योजिका, महिला उद्योजिकांना राज्य पातळीवर ओळख निर्माण करून देणे तसेच त्यांच्या उद्योगाला गतिमान करणे हा हेतू लक्षात ठेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यवसायाला गगन भरारी देण्यासाठी महाराष्ट्रातील नावाजलेली मॅजिकल चारमंट ह्या सर्टिफाइड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सोबत प्रिंट मीडिया पार्टनर लोकमत आणि कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच यांना सोबत घेऊन “मणिकर्णिका २०२४” सन्मान सोहळा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई येथे वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पार पडला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam