तळवली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 75 वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 75 वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा….

तळवली (मंगेश जाधव).

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी येथे दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी 75 वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक मा. एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जेष्ठ शिक्षक श्री. पी. व्ही.साळुंके सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच इतर सर्व सहकारी शिक्षक बंधूभगिनी पुष्प वाहुन अभिवादन केले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.श्रीनाथ कुळे सर यांनी प्रारंभी आपल्या प्रस्ताविकेतून अमृतमहोत्सवी संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करून कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.त्यानंतर इयत्ता दहावीची विद्यार्थीनी कु. माही मयेकर हिने भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनीही पाठोपाठ वाचन केले.त्यानंतर मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, त्यातील मुलभूत हक्क, अधिकार व कर्तव्ये, भारतीय समाज व स्त्रीयांसाठी केलेले कार्य या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन भारतीय संविधान म्हणजे आपला श्वास आहे, त्याची जपणूक केली पाहिजे प्रत्येकांनी त्याचा आदर राखला पाहिजे. संविधानाचा अभ्यास करून समाजात जागृती केली पाहिजे,असे आवाहन केले.*
*प्रशालेचे कला शिक्षक श्री. श्रीनाथ कुळे सर यांनी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सुंदर असे फलक लेखन केले होते. या कार्यक्रमाचे ते एक विशेष आकर्षण होते. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत होते.*
*अमृतमहोत्सवी भारतीय संविधान दिनानिमित्त समाज जागृतीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची भव्यदिव्य अशी प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने जयघोष करत मोठ्या उत्साहात सहभाग दर्शवला. भारतीय संविधान चिरायू होवो, बाबासाहेबांचे योगदान… भारतीय संविधान,संविधान दिनाचा विजय असो,भारत माझी माऊली… संविधान त्याची सावली, संविधानाचा सन्मान… हाच आमचा अभिमान. या सारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले.*
*प्रभात फेरी परत आल्यानंतर पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून… संविधान दिनाविषयी माहिती दिली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री. कुळे सर, जेष्ठ शिक्षक श्री साळुंके सर,श्री.बागल सर,श्री.केळस्कर सर, श्री.गवळी सर, सौ.नाईक मॅडम, सौ. कांबळे मॅडम, कु सावंत मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. अक्षय चव्हाण,श्री.प्रणय आरोलकर व इतर सहकारी यांनी केले होते. या कार्यक्रमात व प्रभात फेरीमध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.श्रीनाथ कुळे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

???? Plz Join whatsup group

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv ????????

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न