अडीच वर्षाच्या महायुती चे कार्यकाळात मी समाधानी आहे.- एकनाथ शिंदे.
ठाणे – अडीच वर्ष महायुती म्हणून आम्ही चांगलं काम केले, रात्री फक्त ३ तास झोप घेत होतो पण सतत महाराष्ट्र जनते साठी काय करता येईल याचाच विचार असायचा, चांगल्या योजना लोककल्याण कारी निर्णय आम्ही अमलात आणले, संपूर्ण महाराष्ट्र मधील बहिणींनी मला l भाऊ मानलं आहे. हेच माझ कमाई आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या सहकार्याने आपण विविध प्रकल्प महारष्ट्र साठी आणलेले मी खूप समाधानी आहे कृपया कोणी गैरसमज करू नये, मी मोदी आणि अमितजी यांना मी काल फोन वरून सांगितले आहे तुम्ही जो युती म्हणून निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल.
आज दुपारी झालेल्या ठाणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार
एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला
अडीच वर्षात केलेल्या कामाबद्दल मी समाधानी– एकनाथ शिंद
मुख्यमंत्रिपदावर मोदी,शहा जो निर्णय घेतील तो मान्य–एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती