सापांच्या संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक- प्रा. डॉ. हरीश बाबर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सापांच्या संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक- प्रा. डॉ. हरीश बाबर

चिपळूण–  साप हा आपल्या सगळ्यांच्याच कुतूहलाचा आणि भीतीचा विषय राहिलेला आहे. सापाबद्दल आजही समाजामध्ये त्यामध्ये शिक्षित, अशिक्षित सर्वच लोकांमध्ये अनेक गैरसमज पाहावयास मिळतात. हेच गैरसमज दूर व्हावेत आणि त्याबद्दलची परिपूर्ण माहिती मिळावी व सापांचे संवर्धन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत प्रा. डॉ. हरीश बाबर यांनी व्यक्त केले.

डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर मौजे चिंचघरी (गणेशवाडी) येथे संपन्न होत या शिबिरात ‘सर्पविश्व’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या व्याख्यानादरम्यान डॉ. बाबर यांनी सापांचे जीवनचक्र,सापांचा अधिवास व पर्यावरणातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणामध्ये आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांच्या प्रजातींची सचित्र माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यामध्ये प्रामुख्याने नाग, मण्यार,घोणस व फुरसे या विषारी सापांच्या प्रजातींबाबतची सचित्र आणि सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

साप हा अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा सजीव असून, सापाबद्दल असलेल्या भीती आणि गैरसमज मुळे आज सापांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी सापाबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन सापांच्या प्रजातींचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, प्रा. राजकुमार पाटील, प्रा. दत्तप्रसाद चव्हाण, प्रा. प्रेमकुमार शिवगण, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरूण जाधव, सल्लागार प्रा. विनायक बांद्रे, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. प्रदीप वळवी, प्रा. सौ. सुजाता खोत, प्रा. सौ. कांचन तटकरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रिया खातू व प्रमुख वक्त्यांचा परिचय कु. शुभम कदम यांनी तर आभार प्रदर्शन कु. याज्ञी फाटक यांनी केले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई