राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड; रोहित पाटलांवर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड; रोहित पाटलांवर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी

मुंबई– विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट कामाला लागला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाने आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जिंतेद्र आव्हाड, रोहित आर आर पाटील आणि उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांवर जबाबदारी सोपवण्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तिन्ही नेत्यांकडे मोठी जबाबदारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे नवनिर्वाचित आमदार आणि दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र, देशातील सर्वात तरुण आमदार असलेले रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शरद पवारांनी रोहित पाटील यांना लहान वयात मोठी जबाबदारी सोपवल्याचं दिसून येत आहे. मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आली असून उत्तम जानकार यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झालेला नाही. पुढील बैठकीत विधीमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत विधीमंडळात गटनेतापदी जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोदपदी रोहित आर आर पाटील, प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची नेमणूक करण्यात आली. शरद पवार गटाच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, ‘विधिमंडळ नेता आज निवडला गेला नाही. संदीप क्षीरसागर आज उपस्थित‌ नव्हते. आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं, याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. फॉर्म १७ आणि मतांची आकडेवारी जुळत नसेल तर हे फार गंभीर आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam