विश्व हिंदू परिषद गुहागरच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विश्व हिंदू परिषद गुहागरच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन

गुहागर प्रतिनिधी

बांग्लादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी हीच आमची मागणी असल्याचे निवेदनात देण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद गुहागरच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मूक मोर्चा गुहागर शिवाजी चौक येथून तहसीलदार कार्यालय गुहागर येथे संपन्न झाला. त्यानंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये २६३ पुरुष आणि ९८ महिला सहभागी झाल्या होत्या. बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील तो अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी. तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलीत हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे. बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे.

या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो. या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणार्‍या इस्कॉनच्या साधूंना देखील बांग्लादेशच्या सरकारने देशद्रोह्याची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी बांग्लादेश मधील हिंदूंची संख्या ३८ टक्के होती ती घटून आज केवळ आठ टक्केच राहिली आहे. आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील ८% हिंदू व अन्य अल्पसंख्यांक समाज जिहादी इस्लामी कट्टरता बादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल, असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की, बांग्लादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांग्लादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे, अशी विनंती करण्याकरिता चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आज मूक मोर्चा काढला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश आबळोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश...
Read More
आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील...
Read More
एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना हाताला काम देणारी महात्मा गांधी...
Read More
नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

🔴 लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी : ७६ दिवसांपासून सुरू धरणे आंदोलन;...
Read More
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

*खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार   राजगुरुनगर (गुरुदत्त वाकदेकर): येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा...
Read More
खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६...
Read More
गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार गुहागर - गेले पंचवीस तीस वर्ष भजनी कलावंत म्हणून काम...
Read More
नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

💠 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना! ### ✅ राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ नोव्हेंबर २००५...
Read More
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!