कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

 

मुंबई– मुंबईतील कुर्ल्यात अपघाताची मोठी घटना घडली आहे. कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री रोडवर भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने रस्त्यावरील अनेकांना चिरडले आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

 

सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेस्ट इलेक्ट्रिक बस जी कुर्ला स्टेशन (पश्चिम) ते LBS रोड कडे जाते होती. मात्र बस अनियंत्रित झाल्याने 25 विविध प्रकारच्या वाहनांना धडक दिली. पुढे जाऊन एका इमारतीची भिंत तोडून एका RCC कॉलमवर धडकली. रस्त्यावरील आणि वाहनांमधील ५ जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

 

जखमींना कुर्ल्यातील भाभा रुग्णालय, राजावाडी, सायन रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाभा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार 25 जखमींची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीचा उपचारानंतर मृत्यू झाला आहे. पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितलं की, कुर्ल्यात अनियंत्रित बेस्ट बसने काही वाहनांना चिरडले. 25 जण जखमी झाले तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसच्या चालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...