शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थांची शास्त्रीय पद्धतीने शेवंतीची आधुनिक फुलशेती
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय,खरवते-दहिवली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून शेवंती फुलांची लागवड करण्यात आली आहे.कोकणामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात घेऊन फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खुप कमी आहे,परंतु कोकणातील वातावरण हे यासारख्या फुलशेतीस अगदी पोषक आहे.स्थानिक शेतकऱ्यांमध्ये फुलशेतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशातून विद्यार्थ्यांकडून हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.या प्रयोगासाठी शेवंतीच्या श्वेता व्हाईट व समृद्धी व्हाईट या जातींची निवड करण्यात आली आहे.विशेष बाब म्हणजे या संशोधनात्मक प्रकल्पासाठी ‘कॅडाॅक्स हडसन इफेक्ट’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे.यामध्ये सुमारे ४६ एलईडी बल्बचा वापर करण्यात आला आहे.या अभिनव तंत्रज्ञानामुळे फुलांची संख्या,आकार,वजन,व आयुष्यमान वाढीस मदत होते व रोपांमधील प्रकाश संश्लेषण क्रीया उत्तम रित्या चालु राहते. विद्यार्थ्यांकडून या सर्व रोपांना रात्री सुमारे ०७ ते ०८ तास कृत्रिम प्रकाशाचा पुरवठा केला जातो,जेणेकरुन फुलांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.ही संपूर्ण फुलशेती मल्चिंगच्या गादि वाफ्यांवर साकारण्यात आली आहे.४५×४५ से.मी.अंतरावर सुमारे १२०० रोपांची लागवड विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. कोकणामधील शेतकऱ्यांसाठी हा अनोखा व नावीन्यपूर्ण फुलशेती प्रयोग अत्यंत फायदेशीर आहे,यासाठी हे विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि विद्यमान आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठीचा हा संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यात आला आहे.हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्राध्या.स्मिता जाधव व डाॅ.ओंकार निर्मळ यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे.
????Pz जॉइन whatsup group ????????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv