भास्कर जाधवांनी अधिवेशनच हादरवलं..! उपस्थित केला ‘हा’ गंभीर मुद्दा!!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 भास्कर जाधवांनी अधिवेशनच हादरवलं..! उपस्थित केला ‘हा’ गंभीर मुद्दा!!

नागपूर -हिवाळी अधिवेशनास न फिरकलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या कशा? असा रोखठोक सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना केला. तसेच, २९३च्या प्रस्तावावर ८६ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असून प्रत्यक्षात मात्र यापैकी १७ आमदार अधिवेशनास गैरहजर असल्याची गंभीर बाब भास्कर जाधव यांनी उघड केली. शिवाय, या प्रकारावर विधानसभा अध्यक्षांकडे उत्तरही मागितले.

भास्कर जाधवांनी अधिवेशनच हादरवलं..! उपस्थित केला ‘हा’ गंभीर मुद्दा!!

सत्ताधाऱ्यांच्या या प्रस्तावावर बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. शिवाय जर आमदार अधिवेशनासच उपस्थित नसतील तर त्यांच्या स्वाक्षऱ्या कोणी केल्या, हे समोर आणलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी विधिमंडळ अध्यक्षांकडे केली. तसेच, भास्कर जाधव म्हणाले, मी हा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधाऱ्यांकडून विरोध झाला. मात्र मी हजेरीपटावरून हे सिद्ध केलं आहे की १७ आमदार गैरहजर असूनही त्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत.

भास्कर जाधवांनी अधिवेशनच हादरवलं..! उपस्थित केला ‘हा’ गंभीर मुद्दा!!

याशिवाय दोन दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काल हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. यावरही भास्कर जाधव यांनी टोला लगावत मी अजितदादांना त्यांचा घसा खराब असल्याने खोगोची गोळी देणार आहे, ती अजितदादांनी घशात ठेवावी, असंही म्हटलं.

खरंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून अजित पवार गायब होते. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही ते दिसत नव्हते.

भास्कर जाधवांनी अधिवेशनच हादरवलं..! उपस्थित केला ‘हा’ गंभीर मुद्दा!!

घशाला त्रास होत असल्याने त्यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिला गेला होता, अशी माहिती त्यांच्या पक्षाकडून समोर आली आहे. परंतु भुजबळांना मंत्रिमंडळातून डिच्चू दिल्यानंतर भुजबळांनी घेतल्या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवार माध्यमांपासून दूर राहण्यासाठीच गायब होते, अशी चर्चा सुरू आहे.

अजित पवारांबाबत कोणी म्हणत होतं की ते दिल्लीत गेले, तर काहींनी नागपूरमध्येच असल्याचा दावा केला होता. एवढच नाहीतर मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खातेवाटपवारून ते नाराज असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, बुधवारी ते विधानसभेत दाखल झाले. तासभर बसून होते.

मात्र, ते एक शब्दही बोलले नाहीत. माध्यमांशी संवाद साधण्याचेही टाळले. त्यामुळे आता त्यांच्या मौन रागाचीही चर्चा रंगली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या
shivam