महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

मुंबई:—आज नवीन वर्षाची अर्थात २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. २०२४ या वर्षाला निरोप देत २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात जगभरात जल्लोषात झाली आहे. देशभरातील विविध ठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

याबरोबरच अनेकांनी या नव्या वर्षांत वेगवेगळे संकल्पही केले आहेत. राजकीय नेतेमंडळींकडून देखील २०२५ या नव्या वर्षासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच नववर्षाच्या शुभेच्छांसाठी सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील जनतेला नव्या वर्षासाठी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असा संकल्प केला. तसेच राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शांतता-सलोखा वाढवत, पर्यावरण जपत आणि विकासासोबत आधुनिकीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राला अग्रगण्य बनवण्याचे उद्दिष्ट ठेऊन सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या संकल्पांची नववर्षात पूर्तता होईल, अशी मनोकामना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच २०२५ मध्ये पाऊल ठेवताना एकता आणि दृढनिश्चयाने नवीन संधींचे स्वागत करूया. हे वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराटीचे जावो.

२०२५ या नव्या वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक आणि आरोग्यदायी शुभेच्छा, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.*

राज्यातील तमाम बंधू-भगिनींनो,गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२४ हे वर्ष आता सरलं, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवत येणारे #२०२५ साल आपल्याला खुणावत आहे. आपण सर्वजण येणाऱ्या नवीन वर्षात नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे संकल्प, नवी दिशा उरात बाळगून आहोत.

परंतु, नववर्षाचे स्वागत करताना आपल्या उत्साहाचा, कृतीचा, आचाराचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणालाही त्रास होणार नाही याची एक सुज्ञ व सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तसेच इतर सरकारी यंत्रणा त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे बजावतील यात मला तीळमात्र शंका नाही.

आपण सर्वांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. चला तर मग, आपण सर्वजण मिळून सरणाऱ्या २०२४ सालास निरोप देत येणाऱ्या २०२५ या नववर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे की, राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो.

नवीन २०२५ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा देतो. नववर्षाचं स्वागत उत्साहानं मात्र, आरोग्यभान राखत संयमानं करा, असं देखील आवाहन करतो. महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला.

महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करूया.

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर सुरू असलेली आपली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया, अशा शब्दांत अजित पवारांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam