उबाठा शिवसेनेला कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता
मुंबईतील नको, नेतृत्व स्थानिकच हवे : आ. भास्कर जाधव
रत्नागिरी : कोकण हा शिवसेनेचा गेली अनेक वर्षे बालेकिल्ला होता. मात्र पक्ष फुटीनंतर नुकत्याच झालेल्या विधानसाभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षासह आम्हाला सर्वांनाच काही गोष्टी बदलाव्या लागतील. पक्षाच्या कार्यपध्दतीत, बदल करावा लागेल. आता मुंबईतून येथे नेतृत्व आणून उभं करण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व पुढे आणावी आणि उभी करावी लागतील. संपर्कप्रमुखदेखिल स्थानिक स्तरावर निर्माण करायला हवा, जिल्हाप्रमुखाला खास अधिकार द्यावे लागतील, असे मत उबाठा नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ते आले असता एका खासगी वाहिनी चे प्रतिनिधि शी बोलताना त्यांनी वरील मत मांडले