वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये बालिका दिन उत्साहात संपन्न

गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी अर्णवी पुंडलिक नाटेकर ही होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, महिला मंडळाच्या विशाखा नाटेकर, सुवर्ण कोळथरकर ,मत्स्यगंधा कोळथरकर, तसेच शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार ,धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.श्री शंकर कोळथरकर यांचे शुभ हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यावेळी विद्यार्थी सावित्रीबाई फुले यांचा वेश धारण करून आल्या होत्या .विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे झाली.त्यावेळी बोलताना शंकर कोळथरकर म्हणाले की पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षण तज्ञ, पहिल्या विचारवंत पहिल्या लेखिका ,पहिल्या कवयित्री सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने आपल्या आदर्श आहेत.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले व स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले .त्यावेळी मोठा गट कबड्डी जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल अर्णव रोहीलकर रुद्र कोळथरकर एवन नाटेकर व आर्यन नाटेकर या विद्यार्थ्यांचा शाळा शैक्षणिक साहित्य व उच्च देऊन सत्कार करण्यात .आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसाना मुल्ला यांनी केले