अखेर बांगलादेशी नागरिकाला खोटा दाखला देणाऱ्या त्या ग्रामसेवकांच निलंबन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बांग्लादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक वासुदेव सावके निलंबित

मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं निलंबित

रत्नागिरी – शहरालगतच्या शिरगांव ग्रामपंचायत येथून बांग्लादेशी नागरिकाला जन्मदाखल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुंबई येथे या बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रावरुन ही बाब समोर आली होती. याची गंभीर दखल घेऊन जन्मदाखला देणाऱ्या तात्कालीन शिरगांव ग्रामसेवक वासुदेव सावके यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केला आहे. याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत वासुदेव सावके यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजारी यांनी दिली आहे.

मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ शिरगांव ग्रामपंचायत येथील जन्मदाखला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार त्याचे जन्मदाखल्यावर पत्ता जन्म १ मे १९८३ रोजी उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि रत्नागिरी असा आहे. तसेच आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्मदाखला तयार केल्याचे आढळून आले होते.

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...