साखर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा उत्सव विविध खेळांनी संपन्न

चव्हाणवाडी(श्री मनोहर धुरी)
राजापूर तालुक्यातील साखर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा उत्सव विविध खेळांनी संपन्न झाला या क्रीडा उत्सवाचा शुभारंभ श्रमिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण सखाराम तांबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी मुलांना शालेय क्रीडा शपथ देऊन सर्वांनी खिलाडी वृत्तीने खेळ करा तसेच प्रत्येक खेळाडू हा आपला फक्त एखाद्या सामन्या पुरता विरोधक असतो मात्र तो आपला कायमचा मित्र असतो असा मोलाचा सल्ला दिला यावेळी दोन गटात विजेता चषक आयोजित केला होता ज्या वर्गाचे पदक जास्त त्याला विजेता चषक देण्यात येणार होता यामुळे सर्व वर्गातील मुले मुली चुरशीने खेळत होते मात्र यावर्षी मोठया गटात इयत्ता 10 वी तर लहान गटात इयत्ता 6 वी ने अंतिम विजेते पद पटकाविले यावर्षी गुलाबी रंगाचे ती शर्ट परिधान केलेले खेळाडू या क्रीडा उत्सवाचे आकर्षण वाटत होते आणि सर्वांचे मन वेधून घेत होते या उत्सवा साठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि क्रीडारसिक श्री दिगेश बाणे व श्री अतुल मिरगुले यांनी विजेत्यांसाठी चषक देणगी रूपाने दिले होते मात्र यावर्षीचा क्रीडा उत्सव सुपर रेड बोनस ऑन च्या जयघोषात व चौकार षटकारांच्या फटक्यात आणि खिलाडी वृत्तीने शैक्षणिक वातावरणात पार पडला हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सौ रेणुका राणे सहकारी शिक्षक श्री जगन्नाथ शिंदे श्री विश्वास सागवेकर श्री जयवंत सावंत श्री श्रीकृष्ण बावीलकर सौ स्वाती बनगर श्री वारीक यांनी विशेष मेहनत घेतली