महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन तालुका गुहागर अध्यक्ष पदी श्री साईनाथ बागुल तर उपाध्यक्ष पदी श्री सुरेश गोरे यांची बिनविरोध निवड
शृंगारतळी ( वार्ताहर).
गुहागर तालुका ग्रामपंचायत युनियन ची आज दि. 11/01/2025 रोजी चिखली येथे सभा झाली या सभेत गुहागर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) उपस्थित होते या सभेत विविध विषयवार चर्चा करण्यात आली तसेच युनियनचे यशस्वी रित्या काम करण्यासाठी नवीन अनुभवी कार्यकारणीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये यापूर्वी युनियनचे अध्यक्ष म्हणून श्री साईनाथ बागुल तर सचिव म्हणून श्री सुरेश गोरे यांनी सुंदर कामकाज केले होते हे लक्षात घेता तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी बिनविरोध पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून श्री साईनाथ बागुल तर उपाध्यक्ष म्हणून श्री सुरेश गोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.