२६जानेवारी २०२५ रोजी पन्हळे तर्फे राजापूर अनधिकृत मदरसा विरोधात आमरण उपोषण साखळी पद्धतीने.
राजापुर – (पुरुषोत्तम खांबल)
मागील एक वर्षापासून पन्हळे तर्फे राजापूर धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील या गावातील ग्रामस्थ अनधिकृत मदरसा विरोधात ग्रामपंचायत, तहसीलदार ,प्रांत तसेच कलेक्टर यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील या मदरसा संदर्भात कोणतेही शासन योग्य ती कारवाई करत नाही म्हणून पन्हळे तर्फे राजापूर येथील ग्रामस्थ दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण साखळी पद्धतीने करणार आहेत अशी माहिती गावाच्या वतीने अमोल रमेश सोगम यांनी दिली.
तसेच अमोल रमेश सोगम हे बोलताना म्हणाले कोणतेही कागदपत्र कोणतेही परवानगी न घेता येथे मदरसा व इमारती उभारल्या गेल्या व गावाला झालेला त्रास लक्षात घेता येतील मदरसा लवकरात लवकर बंद करा असं अमोल सोगम यांनी गावाच्या वतीने बाजू मांडली.
तसेच दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी स्थगित केलेले आमरण उपोषण साखळी पद्धतीने दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी करण्याच्या निर्णयापर्यंत आलो आहोत असे अमोल रमेश सोगम बोले