
मनमाड-(वार्ताहर)….
धक्कादायक चक्क लेडीज पोलीस कॉन्स्टेबल चा च नायलॉन मांजा ने जखमी केलं.
संपुर्ण राज्यात नायलॉन मांजा व चायनीज मांजा वर बंदी असताना देखील अनेक ठिकाणी तो सर्रास पणे विकला जात आहे, येवला,मनमाड,नाशिक. नांदगाव येथे अनेक घटना ताज्या असतानाच आझ मनमाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या लेडीज पोलीस कॉन्स्टेबल रेखा फडतले यांचा नायलॉन मांजने गळा कापला गेला तिच्यावर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नायलॉन मांजा विक्री संदर्भात कठोर नियमावली असताना हि काही दुकानदार व एजेंट हे गुपचूप विक्री करताना दिसत आहेत.तरी प्र शासनाने गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी जनते तून मागणी होत आहे














