पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; लोखंड बांधून मृतदेह विहिरीत टाकला; दापोलीतील घटना; रत्नागिरी जिल्हा हादरला

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; लोखंड बांधून मृतदेह विहिरीत टाकला; दापोलीतील घटना; रत्नागिरी जिल्हा हादरला

नवी मुंबई प्रतिनिधी (मंगेश जाधव)…

आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार दापोली तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता त्या दिशेने तपास करून अवघ्या 48 तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठे यश आल आहे. केशकर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर याचा कट रचून खून झाल्याचं आता पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी नेहा बागकर व पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चीजगरकर या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दापोली शहराजवळ गिम्हवणे येथे निलेश बागकर याचा केशकर्तनालयाचा पारंपारिक व्यवसाय आहे. मृत निलेश याची पत्नी नेहा बागकर हीच्याजवळ अनेकदा काही घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश व काही नातेवाईकांना होता. मात्र आपल्या वाटेत अडथळे असलेल्या पती निलेश याला संपवण्याचा कट पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने आठवड्यापूर्वीच रचला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आपल्या पती बेपत्ता असल्याचा तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलावले होते. त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा ही जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टाइमिंग व तिने पोलिसांना चौकशी सांगितलेले टाइमिंग यामध्ये तफावत आढळताच पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला. यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं मात्र बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीचा पोलिसी हिसका दाखवताच त्यावेळी तिने या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांना दिली आहे. यावेळी कार मध्ये बसलेला निलेश व त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही सीसीटीव्ही फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आले आहे.

 

या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी नेहा बागकर हिचा पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चीजगरकर याच्या मदतीने हा खून केला आहे. मंगेश व नेहा, निलेश यांचे गेल्या दहा-बारा वर्षांपासून घरगुती संबंध होते त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आला नाही याच सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी हर्णै येथे मयत निलेश पत्नी नेहा व मंगेश या तिघांनीही निलेश याला कारमधून पार्टीसाठी नेले होते या ठिकाणी निलेश व नेहा या दोघांनीही ड्रिंक केले व हर्णै बायपास येथे अत्यंत निर्दयीपणे निलेशाचा गळा आवळून नेहा व मंगेशने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशला पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेश चा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून देण्यात आला अशी ही कबुली नेहा बागकर हिने पोलीस तपासात दिली आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसात पथकाने पालघर येथील विहिरीत गळ टाकून हा निलेश याचा मृतदेह बाहेर काढला आहे.

 

यावेळी नेहाचा प्रियकर संशयित मंगेश हा फरार झाला होता. त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावत दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमध्ये बसला होता त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली आहे. दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हत्या करणे, हत्येचा कट रचणे, पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे ,सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला आहे. दरम्यान, पत्नी व प्रियकराने निलेश याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न