मीत फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मीत फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

नवी मुंबई (मंगेश जाधव)

मीत फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त नुकताच संपन्न झाला. त्या प्रसंगी शितल बल्लाळ – राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा कर- मुंबई , रोहन पेडणेकर – सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक ,जयश्री पवार -सिने अभिनेत्री, संदेश चव्हाण – संचालक – ओला वाकोला बँक्वेट हॉल तसेच चित्रकार अक्षय गवई, सामाजिक कार्यकर्ता अस्मिता चौगुले, महानगर पालिका अधिकारी अनिल पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

 

सदर वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने व संधी या बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर दिवाळी निमित्त घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करणतात आला. त्यात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक – यामिनी मुणगेकर (श्रीमती जानकीबाई रमा साळवी महाविद्यालय, कळवा), द्वितीय क्रमांक – केशव पाटील (श्रीमती जानकीबाई रमा साळवी महाविद्यालय, कळवा) , तृतीय क्रमांक – एकता चव्हाण (श्रीमती जानकीबाई रमा साळवी महाविद्यालय, कळवा) आणि उत्तेजनार्थ – किशोर शेटे ( थिरणी महाविद्यालय, वर्तक नगर ,ठाणे) तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक – वैष्णवी नाईक (पी.आर. हायस्कुल, भिवंडी), द्वितीय क्रमांक – अन्सारी मोहमद आसिफ जमीर (श्रीमती जानकीबाई रमा साळवी महाविद्यालय, कळवा), तृतीय क्रमांक – वेद ढोके (पाटकर गुरुजी विद्यालय, दादर) तसेच उत्तेजनार्थ आर्या महाडिक (सिक्रेड हार्ट हायस्कुल, नालासोपारा आणि सई जाधव, (सेंट अलॉयसियस हायस्कूल, नालासोपारा) या विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नील मेस्त्री या चिमुकल्यांने आपल्या भाषणाने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या जगदाळे यांनी केले असून. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर गायकवाड, सुजल जाधव, विदिशा मिश्रा, आंचाल मिश्रा, निहार जाधव, तेजस जाधव, साहिल तांबे, देवेंद्र जाधव यांनी सहकार्य केले.


[post-views]

Leave a Comment

आणखी वाचा...