एसटीचा प्रवास आजपासून महागला; महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर; सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री लागणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एसटीचा प्रवास आजपासून महागला; महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर; सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री लागणार

मुंबई– सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याचीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्याभाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास आता महागणार असून एसटी दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्याआधी एसटी दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर आता महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एसटीच्या तिकीटात 14.95 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मुंबईमधील प्रवाशांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. हे नवे दर कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती.

मात्र आता हे नवे दर आजपासूनच लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राज्य परिवहन खात्याने एसटी दरवाढ केल्यानंतर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढही होणार आहे. गेल्या काही वर्षापासून टॅक्सी आणि रिक्षा यांची भाडे वाढली नाहीयेत त्यामुळे ३ रूपयांनी भाडेवाढ करण्याची मागणी होती. ही भाडेवाढ होणं गरजेचं आहे नाहीतर आमचं जगणं मुश्किल होईल असं टॅक्सी रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. त्यानुसार आता टॅक्सी आणि रिक्षाचाही प्रवास महागला आहे. टॅक्सी आणि रिक्षामध्ये तीन रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. टॅक्सी सध्याचे दर हे 28 रुपये आहेत तर आता नव्या दरवाढीनुसार ते 31 रुपये होतील. तसेच रिक्षाचे सध्याचे दर हे 23 रुपये असून नव्या दरवाढीनुसार 26 रुपये मोजावे लागणार आहेत. दोन फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ होईल अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार