महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा , ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे .

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा , ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे .

मोठा उलटफेर ! चक्क दर कमी करण्याचा महावितरणचा वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव

पुणे :- महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा देत ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला आहे. तर २०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी जवळपास समान दर ठेवण्याचा प्रस्ताव असल्याने एकंदरीतच महागाईतही महावितरणने सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषिपंप व घरगुती वापरासाठीही सौरऊर्जेचा वाढता वापर यातून सुमारे २ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत असल्याने महावितरणचा खर्च कमी झाला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर हा निर्णय १ एप्रिलनंतर लागू करण्यात येणार आहे.

वास्तविक महावितरण आणि देशातील सर्वच वितरण कंपन्या थकबाकी मुळे ट्रस्ट आहेत. अशा परिस्थितीत हा प्रस्ताव आश्चर्यकारक आहे.

महावितरणला पुढील पाच वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा लागतो. त्यानुसार महावितरणने २०२९-३० पर्यंतच्या पाच वर्षांसाठीच्या दर पुनर्रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. यात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे.

सध्या लघुदाब ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत वीज वापर असल्यास ८९० रुपये वीजबिल येते. नव्या प्रस्तावात या ग्राहकांना दिलासा देत त्यांचे मासिक वीजबिल ५० ते ६० रुपयांनी कमी होणार आहे. हे बिल आता ८३० रुपयांपर्यंत खाली येणार आहे. तर १०१ ते २०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा देत केवळ १.५ ते २ टक्के दरवाढ अर्थात केवळ २० रुपयांची किरकोळ दरवाढ सुचविण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा वीजवापर असणाऱ्या बहुतांश ग्राहकांना वीजबिलात कोणताही फरक नसेल. त्यामुळे महावितरणने अनेक वर्षांत वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदाच सादर केला आहे.

कृषिपंपांसाठीही सौर वीज वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर वीज वाचत आहे. महावितरणमधील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेतून मिळत असल्याने खर्चावरील मोठा ताण कमी झाला आहे. ही वीज केवळ ३ रुपये प्रतियुनिट या दराने मिळत आहे. सौरऊर्जेचा वापर वाढणार असल्याने भविष्यात महावितरणचा खर्चही कमी होणार आहे. परिणामी आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात दरवाढीऐवजी दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार