रस्त्यात अचानक माकडे आडवी आल्याने मोटर सायकल स्वार जखमी तर माकडाचा मृत्यू.
लांजा – (वार्ताहर )रस्त्यात अचानक माकडे आडवी आल्याने मोटार सायकलची धडक बसून एका माकडाचा मृत्यू झाला तर मोठा सायकलस्वार जखमी झाले. ही घटना लांजा साठवली मार्गावर आज शुक्रवारी सायंकाळी 3.30 वाजता साठ वली येथे घडली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील साठवली पंचक्रोशीत माकडानी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. लोकांच्या घराबरोबरच भाजीपाला आंबा काजू नारळ पिकांची नाजदुस केली जाते. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी माकडे पकडण्याची मोहीम लांजा वनविभाग ,प्राणी मित्र व सामाजिक कार्यकर्ते साटवली यांचेमार्फत माकडे पकडण्याची मोहीम देखील राबवण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही माकडांचा उपद्रव सुरूच आहे.
आज शुक्रवारी सायंकाळी लांजा साठवली मार्गावर साटवलीतून लांजाकडे येणाऱ्या मोटरसायकल स्वारासमोर अचानक 15 ते 20 माकडांची टोळी रस्त्यात मधोमध समोर आल्याने मोटार सायकल स्वार रस्त्यात कोसळले. त्यांच्या हाता पायाला आणि डोक्याला दुखापत झाली तर या अपघातात एका माकडाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अपघातात जखमी झालेले श्री .महादेव शंकर राप व त्यांच्याबरोबर दुचाकी वर सोबत असणाऱ्या एका इसमाला प्राथमिक आरोग्य केंद्र साठवली येथे दाखल करून त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात आले.
बातमी प्रसिद्धी – जितेंद्र चव्हाण