राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

नवीदिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. ही सुनावणी आज होत असल्याने सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा युक्तिवाद शरद पवार यांच्या वकिलांनी केला गेला होता. त्यावेळी कोर्टाने अजित पवार यांना “तुम्ही वेगळी भूमिका घेतली आहे, त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं रहा” असा सल्ला दिला होता. 6 फेब्रुवारी 2024 ला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती. या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. तर शरद पवार यांना 22 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अजित पवार यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे असं शरद पवार यांच्या गटाचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर मार्चमध्ये सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता. यावर न्यायालयाने “आम्ही शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही असं लिखित द्या”, असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला दिला होता. त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नसल्याने आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न