न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूरला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत द्वितीय क्रमांकाचा सन्मान
✍️राजू सागवेकर /राजापूर
▪️ राजापूर – महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय, जैतापूर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राजापूर तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल शाळेला २ लाख रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.
▪️ हा पुरस्कार राजापूर तालुका प्रांत अधिकारी मा. डॉ. जस्मिन यांच्या हस्ते राजीव गांधी स्टेडियम, राजापूर येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका व प्राचार्या सौ. राजश्री राजगौडा नारे यांनी हा सन्मान स्वीकारला. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी श्री. उत्तम भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
▪️ कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त श्री. दिवाकर आडविरकर, जेष्ठ शिक्षक श्री. विजय कुणकवळेकर, श्री. सर्जेराव कडव, श्री. सावंत, सौ. बाकाळकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. आदित्य करगुटकर व श्री. कासम तडवी उपस्थित होते.
▪️ ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभरात तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर राबविण्यात आले. यामध्ये विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला.
▪️ या यशाबद्दल संपूर्ण जैतापूर परिसरात आनंदाचे वातावरण असून शाळेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Author: Raju Sagvekar
🔴 राजू सागवेकर 🔴 वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702