जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूण गोंधवली मध्ये, प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान.

लांजा ( जितेंद्र चव्हाण- वार्ताहर) तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूण गोंधवली मध्ये करण्यात आला ध्वजारोहण.
ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वाडी मध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. केंद्र स्तर व बीट स्तरावर विजयी विद्यार्थी कु. वैष्णवी चंदुरकर, कु.सृष्टी डोंगरकर व कु. गौरी जोंधळे यांचा सन्मान शाळेमार्फत करण्यात आला.
शाळेअंतर्गत विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व पालक व वाढतील नागरिक यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सदर कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानी वाडी प्रमुख संजय सरवदे यांनी भूषवले. शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सौ. अक्षरा पाष्टे, उपाध्यक्ष सौ. जयश्री डोंगरकर, संजय चंदुरकर, जयवंत नेमन, जगन डोंगरकर, सकाराम जोंधळे, महेंद्र तरळ, शरद चंदुरकर व दिलीप जोंधळे चे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये उपस्थित असणारे सर्व पालक, मान्यवर ग्रामस्थ, मार्गदर्शक यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. डाके गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कुटे गुरुजी यांनी केले.