इमारतीचा अनधिकृत वापर बंद,धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा विरोधातील उपोषण मागे.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमारतीचा अनधिकृत वापर बंद,धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा विरोधातील उपोषण मागे.

???? प्रशासनाचा लेखीआश्वासानंतर उपोषण स्थगित.

इमारतीचा अनधिकृत वापर बंद,धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा विरोधातील उपोषण मागे.

????.  महापुरूष मंदिरात महाआरती करून उपोषणाची सांगता.

राजापूर (प्रतिनिधी-पुरुषोत्तम खांबल).

शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसातील विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर करून इमारतीचा अनधिकृत वापर थांबविण्यात आला असल्याने आपण सुरू केलेले आमरण साखळी उपोषण थांबवावे असे लेखी पत्र राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने प्रशासनाच्या विनंतील मान देऊन गुरूवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी हे आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा उपोषणकर्ते अमोल सोगम व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. ज्या मागणीसाठी आंम्ही उपोषणाला बसलो होतो ती मागणी पुर्ण झाल्याने आंम्ही उपोषण स्थगित करत असल्याचे सोगम यांनी जाहिर केले.

गुरूवारी सकाळी ११ वाजता स्थानिक ग्रामस्थ, विविध हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी, भाजपासह अन्य राजकिय पक्षाचे पदाधिकारी व या उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील विविध भागातुल आलेले हिंदू बांधव यांच्या उपस्थित अमोल सोगम व स्थानिक ग्रामस्थांनी तुर्तास हे उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.

प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना स्थलांतर करण्यात आले असून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात आला आहे असे पत्रात नमुद केले आहे. मात्र सदरची अनधिकृत इमारत पाडावी अशी आमची आग्रही मागणी असून तुर्त प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आंम्ही उपोषण स्तगित केले असून सदरची अनधिकृत इमारत पाडण्यासाठी आमचा लढा सुरू रहाणार असल्याचे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी उपोषणाच्या सांगता प्रसंगी स्पष्ट केले आहे.

???? ही पण बातमी वाचा….

http://*धोपेश्वर पन्हळे तर्फे राजापूर अनधिकृत मदरसा विरोधात सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू च…. – Ratnagiri Vartahar* https://ratnagirivartahar.in/archives/7044

धोपेश्वर पन्हळे तर्फे राजापूर अनधिकृत मदरसा विरोधात सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू च….

शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसातील विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २६ जानेवारी पासून आमरण साखळी उपोषण सुरू केले होते. गेली पाच दिवस हे उपोषण सुरू होते. जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्या स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. या उपोषणाला भाजपासह शिवसेना, उबाठा या पक्षांसह विविध हिंदु संघटनांनी जाहिर पाठींबा दिला होता. दिवसेंदिवस या आमरण साखळी उपोषणाला मोठा पाठींबा मिळत होता. या अनधिकृत मदरसा विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यास यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याचा ईशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी देण्यात आला होता.

अखेर प्रशासनाकडूनही याची दखल घेत मदरसा चौकशी प्रकरणी नेमन्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सदरच्या मदरसातील मुलांना स्थलांतरीत करून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात यावा अशी कारणे दाखवा नोटीस दारूल हबीब जनरल एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट यांना शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली होती. या नोटीस मध्ये सदरचा मदरसा अनधिकृत असल्याचे नमुद करताना मदरसा चालविण्यासाठी वक्फ बोर्ड वा धर्मादाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे नमुद करत याबाबत खुलासा करावा अन्यथा मदरसा बंद करणेबाबत कारवाई केली जाईल असे नमुद केले होते.

दरम्यान समिती अहवालावर चर्चा करून व उपोषणाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार विकास गंबरे व राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी बुधवारी रात्री उशीरा उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याच्या विनंतीचे पत्र दिले. आपण दिनांक २६ जानेवारी २०२५ पासून तहसीलदार कार्यलाय राजापूर समोर साखळी उपोषणास बसलेले आहात, आपल्या निवेदनातील मागणी प्रमाणे पन्हळे तर्फे राजापूर गट क्रमांक ५१ हिस्सा नं. १ येथील इमारतीमधील विद्यार्थी हे स्थलांतरीत झालेले असुन इमारतीचा अनधिकृत वापर थांबलेला आहे, तरी आपण आपले साखळी उपोषण थांबवावे असे लेखी पत्र प्रत्यक्ष उपोषणस्थळी जाऊन तहसीलदार यांनी दिले होते.

प्रशासनाच्या या विनंतीला मान देत गुरूवारी सकाळी ११ वाजता सर्व स्थानिक ग्रामस्थांसह उपोषणाला पाठींबा देत सहभागी झालेल्या मान्यवरांच्या तसेच महिला व विविध संघटनांच्या उपस्थितीत आपले साखळी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा अमोल सोगम यांनी केली. यावेळी त्यांनी यासाठी सहकार्य करणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासन, पत्रकार यांचे तसेच उपोषणात सहभाग घेऊन सहकार्य करणारे राजकिय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, शहर व तालुका परिसरातील समस्त हिंदु बांधव यांचे आभार व्यक्त केले. यानंतर समस्त हिंदू बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील श्री महापुरूष मंदिरात महाआरती करून या उपोषणाची सांगता झाली.

याप्रसंगी अमोल सोगम, पुरषोत्तम खांबल, धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम, संदिप सोगम, अरु मांजरेकर यांसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, महिला तालुकाध्यक्ष सौ.सुयोगा जठार ,कोषाध्यक्ष विवेक गुरव, महादेव गोठणकर, दादा मराठे, सुरज पेडणेकर, सुहास मराठे, शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुख कमलाकर कदम, प. स. चे माजी सभापती सुभाष गुरव, सुशांत मराठे, संदीप चव्हाण, निकेश पांचाळ विश्वहिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अद्वैत अभ्यंकर, संदेश टिळेकर, दीलीप गोखले, नेत्रा गोखले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमकर, रिफायनरी विरोधी संघटनेचे अमोल बोळे, काशिनाथ गोरले, आदिसह हिंदू संघटनांचे पदाधिकारी व समस्त हींदू बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

पोलीस उपविभागिय अधिकारी यशवंत केडगे, राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांसह पोलीस कर्मचारी गेले पाच दिवस या उपोषणाच्या पार्श्वभूमिवर राजापूरात तळ ठोकून होते.

राजापूरातील धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशा विरोधातील उपोषण मागे घ्यावे याबाबतचे लेखी पत्र उपोषणकर्ते अमोल सोगम व ग्रामस्थांकडे सुपुर्द करताना तहसीलदार विकास गंबरे याप्रसंगी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, सुयोगा जठार, विवेक गुरव आदी. तर दुसऱ्या छायाचित्रात गुरूवारी सकाळी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहिर करताना अमोल सोगम पुरूषोत्तम खांबल, अभिजीत गुरव ,अद्वैत अभ्यंकर, अरविंद मांजरेकर, हरिचंद्र दादा सोगम, अनंत सोगम आदींसह स्थानिक ग्रामस्थ व हिंदू समाज बांधव.

???? पूर्ण बातमीचा VDO पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के