आज संसदेत सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ संकल्प…. देश भरातून लक्ष..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? सर्वांचे लागले अर्थसंकल्पाकडे लक्ष

आज संसदेत सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ संकल्प…. देश भरातून लक्ष..

नवी दिल्ली– मोदी सरकारचा अर्थसंकल्प (बजेट) आज संसदेत सादर केला जाणार आहे. अवघ्या काही तासात निर्मला सीतारामन अर्थमंत्री म्हणून आपला सलग आठवा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. सामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पावर असेल. अर्थसंकल्पात अर्थमंत्री प्राप्तिकर सवलतीबाबत काही घोषणा करू शकतात, असे मानले जात असताना यावेळी अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत पण, काही निर्बंधही लागू होऊ शकतात. मध्यमवर्गीयांना नेहमीच अशी आशा असते की प्राप्तिकरात काही सवलत मिळेल तर, समाजातील इतर घटकांनाही बजेटमधून वेगवेगळ्या अपेक्षा असतात.

जगभरातील देश AI तंत्रज्ञानाचा क्षेत्रात उडी घेत आहेत. अशा परिस्थितीत, सरकार अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेगळी घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादन उद्योगासाठी २०२५ च्या अर्थसंकल्पात काही सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात. अनेक कंपन्यांना अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. दुसरीकडे, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत मध्यमवर्गाला या अर्थसंकल्पातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा असून देशातील करदाते आणि कॉर्पोरेट इंडिया दोघेही सुधारित प्रपत्तीकर (इन्कम टॅक्स) स्लॅब, कमी जीएसटी दर यासारख्या कर सुधारणांची मागणी करत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना कोट्यवधी जनतेचे लक्ष प्राप्तिकर स्लॅबमधील बदलांवर असेल, ज्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्र, ग्रामीण विकास आणि शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळेल. तसेच भारत, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सरकार धोरणात्मक घोषणा करण्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात विकासदर ६.५ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचवेळी, यावर्षी अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार आक्रमकपणे अग्रेसर असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या जाऊ शकतात आणि आधीच जारी योजनांची व्यक्तीही वाढू शकतात. दुसरीकडे, सर्वसाधारण अर्थसंकल्पात महिला आणि तरुणांसाठी काही मोठ्या घोषणा होऊ शकतात.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न