जि. प. केंद्र शाळा साटवली मराठी मध्ये मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा.

लांजा – (जितेंद्र चव्हाण- वार्ताहर)
साटवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये महिलांचा हळदीकुंकू समारंभ शाळेच्या उपाध्यक्ष सौ. अफ्रिन मापारी, सौ. साक्षी पड्यार, सौ. सुवासिनी किल्लेकर, सौ. श्रेया बापेरकर, सौ. प्राजक्ता सुर्वे, श्रीम. शिंदे मॅडम, श्रीम. कुलकर्णी मॅडम, सौ. योगिता बाणे सर्व महिला भगिनी साठवली उपस्थित होत्या.
श्री. सारवटकर यांनी आकर्षक हळदी कुंकाची रांगोळी रेखाटली होती.
फ्रेंड्स कट्टा ग्रुप माजी विद्यार्थी साठवली त्यांच्याकडून दीपक केंद्र शाळा साठवली मराठी शाळा यांना सीसीटीव्ही संच, वॉटर पुरिफायर, चप्पल स्टॅन्ड-२, रंगीत पिंटर वस्तुरूपाने शाळेला देणगी दिली. शाळेच्या गुणवत्तेत व भौतिक सुविधेत वाढ करण्यासाठी फ्रेंड कट्टा ग्रुप यांनी सहकार्य केले. विशेषता श्री. संजय राऊत, श्री. किशोर जुलूम, श्री. राजू संसारे, श्री. राजू शेरे व इतर माजी विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.
दिनांक 31.1.2025 रोजी जिल्हास्तरावर कबड्डी उपविजयी ठरलेल्या पूर्वजा सुर्वे, भक्ती कातकर, वैष्णवी बापेरकर, सृष्टी बापेरकर व रोजी बरमारे यांना नवीन दप्तर भेटवस्तू देऊन श्री संजय राऊत फ्रेंड ग्रुप कट्टा मुंबई यांनी सत्तावीस विद्यार्थ्यांना गौरवले.
रात्री ८ चे सुमारास शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडले. छोटेखानी विद्यार्थ्यांनी विविध गाणी ,नाटके सादर करून आपले कला कौशल्य रसिक प्रेक्षकांसमोर सादर केले. यावेळी व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र नारकर, मुख्याध्यापक श्री. दिलीप दिवाळे गुरुजी, श्रीम. मयुरी शिंदे श्री सुशील लगदिवे यांनी विशेष मेहनत घेतली.
तसेच फ्रेंड कट्टा ग्रुप साटवली माजी विद्यार्थी श्री. किशोर जुलूम, श्री. शिवप्रसाद नारकर, श्री. राजू शेरे, श्री. दीपक तरळ, श्री. फारुख लांबे, श्री. विश्वास संसारे, श्रीम. गांगण मॅडम, श्रीम. नारकर मॅडम,श्री. राजू संसारे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिवाळे गुरुजी, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्र नारकर यांच्या हस्ते करण्यात आले.