न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेचे ‘ वनभोजन ‘ उत्साहात पार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेचे ‘ वनभोजन ‘ उत्साहात पार

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर या प्रशालेतील इयत्ता 5 वी ते10 वीच्या विद्यार्थ्यांचे बुधवार दि. 5.2.2025 रोजी’ वनभोजनाचा ‘ कार्यक्रम तळवली येथील ‘A Letent Farm Stay , या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी उत्साहात पार पडला.*
*न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेपासून सर्व विद्यार्थी व शिक्षक पायी चालत या ठिकांणापर्यंत गेले. जाते वेळी डावलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.प्रदीप चव्हाण यांच्या सहकार्याने तेथील महिला मंडळाने सर्व विद्यार्थ्यांसाठी चवदार अशी सुकी भेळ बनवून दिली. त्या बद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण यांना मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी वाढदिवसानिमित्त प्रशालेच्या वतीने शुभेच्छाही दिल्या.*
‘ ए लेटेंट फार्म स्टे ‘ तळवली या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. त्या मध्ये ग्रुप डान्स, एकांकिका,कविता वाचन, रेन डान्स इत्यादी मनोरंजनात्मक गोष्टींचा समावेश होता. या कार्यक्रमाचे ॲंकरिंग इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी कु. माही मयेकर, कु. समीरा जोशी, कु. पायल धामणस्कर यांनी केले.
विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. श्रीनाथ कुळे सर यांनी केले होते.त्यांना इतर सर्व सहकारी शिक्षकांनी मदत केली. तसेच ठिकाण ,भोजन व्यवस्था व भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य याचे नियोजन श्री. केळस्कर सर, श्री. देवरुखकर सर व श्री. गवळी सर यांनी केले होते. त्यांना इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
श्री.गुरुनाथ कारेकर शेठ यांनी बनवलेल्या शुद्ध शाकाहारी जेवणाचा मनमुराद आस्वाद सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला.त्याबद्दल श्री. गुरुनाथ कारेकर शेठ यांचे प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. ए लेटेंट फार्म स्टे चे मालक सौ. कोवळे मॅडम, श्री. कोवळे शेठ व श्री. देवेश कोवळे यांचेही पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
वनभोजन हा कार्यक्रम आनंदात, उत्साहात पार पाडण्यासाठी जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर, सौ नाईक मॅडम, श्री गुरसळे सर, श्री. गवळी सर, श्री. केळस्कर सर, श्री. देवरुखकर सर, श्री. कुळे सर, श्री. पुनस्कर सर, सौ. कांबळे मॅडम तसेच उच्च माध्यमिक विभागाचे प्रा. अमोल जड्याळ सर,प्रा आयरे मॅडम, प्रा जड्याळ मॅडम, प्रा. सावंत मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी लिपीक श्री. कदम सर, श्री. अक्षय चव्हाण, श्री.प्रणय आरोलकर यांनी मेहनत घेतली. त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्या बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound