कोंडये येथे रिक्षा सेना चालक-मालक संघटनेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोंडये येथे रिक्षा सेना चालक-मालक संघटनेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

banner

✍️राजू सागवेकर/राजापूर ..

▪️राजापूर तालुक्यातील रिक्षा सेना चालक-मालक संघटना कोंडये यांच्यावतीने श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे.

 

▪️ कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रामदेवतेला श्रीफळ अर्पण करून होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. महाआरती दुपारी १२ वाजता, तर महाप्रसाद दुपारी १ ते ३ वाजता भाविकांसाठी खुला असेल. महिलांसाठी विशेष हळदीकुंकू समारंभ संध्याकाळी ४ ते ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

💥 *विशेष आकर्षण*-

▪️ रात्री १० वाजता चक्री भजन होणार असून, यासाठी बुवा श्री संतोष कानडे (स्वयंभू प्रसादिक चक्री भजन मंडळ, पियाळी) यांचे सुमधुर भजन होणार आहे.

▪️ या धार्मिक सोहळ्याला कोंडये पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तळवडेकर आणि संघटनेचे सर्व रिक्षा चालक-मालक व पदाधिकारी यांनी केले आहे.

कोंडये येथे रिक्षा सेना चालक-मालक संघटनेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

🔴 राजू सागवेकर 🔴 वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

Leave a Comment

आणखी वाचा...