रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने सत्तेच्या विरोधात लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे रहावे अन्यथा भविष्यात जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधकच नसतील – सुहास खंडागळे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने सत्तेच्या विरोधात लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे रहावे अन्यथा भविष्यात जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधकच नसतील – सुहास खंडागळे

रत्नागिरी:-आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील जनता सत्तेच्या विरोधात जनहितासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही तर भविष्यात जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधकच शिल्लक नसतील. यात सर्वाधिक नुकसान सामान्य जनतेचे होईल, याची नोंद आजच्या तरुण पिढीने घ्यावी असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सत्तालोभी राजकारणावर बोलताना व्यक्त केले आहे.

सत्तेत असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जनतेचा दबाव गट हवा,असं जनतेला वाटत असेल तर जनहिताच्या मुद्द्यावर लढणाऱ्या विरोधकांना जनतेने साथ द्यायला हवी. असे आगामी काळात न झाल्यास जनतेचा आवाज उठवणारे विरोधकच शिल्लक राहणार नाहीत. याचा सर्वात जास्त फटका सामान्य जनतेला बसेल. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे विरोधकांकडून हळूहळू कमी होईल.सत्तालोभी राजकारणाचा फटका हा जनतेला बसेल. परिणामी जनतेने लोकांचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे रहावं आणि सत्तेत बसलेल्या लोकांकडून काम करून घ्यावीत असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी या विषयावर बोलताना व्यक्त केले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना असंख्य प्रश्न भेडसावत आहेत पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी, एमआयडीसी विकास त्याचबरोबर शेती क्षेत्रातील समस्या असे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. या प्रश्नांची उत्तरं सत्ताधारी लोकांकडून जनतेला हवी असल्यास सत्ताधाऱ्यांवर जनतेचा दबाव असणे गरजेचे आहे.विरोधी पक्ष खंबीर नसेल तर जनतेचा आवाज शासन दरबारी कोण पोहोचवेल? असा प्रश्नही खंडागळे यांनी उपस्थित केला असून सर्वसामान्य जनतेने आगामी काळात विकासाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दबाव गट म्हणून जनहिताचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांच्या पाठी उभे राहावे असे आवाहन सुहास खंडागळे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनतेला व तरुणांना केले आहे

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी