हॅकेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धेत जि.प.शाळा मुर्तवडे नं.२ कातळवाडी शाळेचे सुयश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हॅकेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धेत जि.प.शाळा मुर्तवडे नं.२ कातळवाडी शाळेचे सुयश

कु.मेघा तांबे,कु.आर्यन गोरीवले,कु.सार्थक रांबाडे हे विद्यार्थी ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

हॅकेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धेत जि.प.शाळा मुर्तवडे नं.२ कातळवाडी शाळेचे सुयश

आबलोली (संदेश कदम)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झालेल्या हॅकेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्तवडे नं. २ कातळवाडी या शाळेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्ह्यातील अनेक सहभागी शाळांमधून मुर्तवडे कातळवाडी शाळेचे प्रतिनिधित्व करताना या शाळेचे विद्यार्थी कु. आर्यन विनोद गोरीवले, कु. सार्थक संदिप रांबाडे, कु. मेघा चंद्रकांत तांबे या विद्यार्थांनी सहभागी होऊन आपल्या कुशल बुद्धीने नेत्रदीपक यश संपादन केले. या विद्यार्थांची पुणे येथे होणाऱ्या हॅकेथॉन स्पर्धेत निवड करण्यात आली आहे
प्रत्येक विद्यार्थांच्या अंगी असणाऱ्या कलात्मक, अभ्यासात्मक गुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम, नव – नवीन कल्पनांना आकार देण्यासाठी विद्यार्थांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करणे, बुध्दीवैभव आणि नव्या विचारांचे दर्शन घडविण्यासाठी आयोजित करण्यात येणारी स्पर्धा म्हणजे हॅकेथॉन स्पर्धा या स्पर्धेतून तंत्रज्ञान शोध घेणे तसेच दैनंदिन कामकाजात नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे यावर काम करणारे न्यायाधीशांचे पॅनल यातूनच या विजेत्या विद्यार्थांची निवड करण्यात येते.

हॅकेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धेत जि.प.शाळा मुर्तवडे नं.२ कातळवाडी शाळेचे सुयश

जिल्हा परिषद शाळा मुर्तवडे नं. २ कातळवाडी या शाळेच्या कु. आर्यन विनोद गोरीवले, कु. सार्थक संदिप रांबाडे, कु. मेघा चंद्रकांत तांबे या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवल्याने या विद्यार्थांची पुणे येथे होणा-या हॅकेथॉन राज्यस्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आल्याने या विद्यार्थांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थांच्या यशामागे मुख्याध्यापक अनंत शिगवण, सहा. शिक्षिका कोहळे मॅडम, सुप्रिया धामापूरकर, सहा. शिक्षक मनोज खामकर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थांचे शालेय शिक्षक वृंद, समस्त कातळवाडी ग्रामिण – मुंबई सेवा मंडळ व शाळा व्यवस्थापन कमिटी तर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून शुभेच्छा देण्यात येत आहेत

हॅकेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धेत जि.प.शाळा मुर्तवडे नं.२ कातळवाडी शाळेचे सुयश

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के