काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती ….
दिल्ली – काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार असून, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. तसेच, त्यांनी पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेसचे सहप्रभारी म्हणूनही काम केले आहे.
या नियुक्तीसह, विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती ….