माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथील १० वीच्या (सन १९९९ – २००० )बॅचचा गेट टुगेदर सोहळा उत्साहात संपन्न.
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयात सन
१९९९ – २००० साली शैक्षणिक शिक्षण घेत असलेल्या १० वी (अ) आणि (ब) या बॅच चा गेट टुगेदर सोहळा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आबलोली येथील विद्यालयात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या सोहळ्याला मुंबई,पुणे, नाशिक, संगमेश्वर, राजापूर,गुहागर अशा ठिकाणा वरून जवळ जवळ ४० मित्र, मैत्रीणी उपस्थित होते. सकाळी १० वाजता ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्याठिकाणी सर्व शिक्षकांना समवेत राष्ट्रगीत घेण्यात आलं,त्यानंतर शाळेतील एका वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सुचनेनुसार शिस्तबध्द पद्धतीने वर्गात प्रवेश केला.
त्यानंतर मान्यवरांना विचार मंचावर स्थानापन्न करण्यातआले .सुरवातीला सभा अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक दिनेश नेटके सर यांची निवड करण्यात आली, त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करून उपस्थित मान्यवर दिनेश नेटके,सौ.नेत्रा रहाटे ,अहिरे सर, विशेष म्हणजे आमच्या वेळी कर्मचारी असलेले बुद्धदास पवार , हरिश्चंद्र साळवी , वैद्य सर,यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी सत्कार मुर्ती बुद्धदास पवार आणि माजी कर्मचारी यांनी एक सुंदर कविता सादर केली.या कवितेला सर्वांनी दाद दिली,त्या नंतर सभा दिनेश नेटके यांनी अध्यक्षीय भाषणात जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला काही अविस्मरणीय क्षणांची आठवण करून देताना शेवटी सांगितले की, असा गेट टुगेदर सोहळ्या पुन्हा होणे नाही असे सांगून सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन अशाच पद्धतीने तुम्हीं सर्व जण सुख दुःखात ही एकत्र रहा असा मौलिक संदेश दिला.
त्यानंतर माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या शाळेतील सन १९९९ ते २००० मधील १० वी( अ)आणि (ब)बॅच कडून १५ हजार रुपये किंमतीचा कलर प्रिंटर भेट म्हणून शाळेला देण्यात आला. शाळेतील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आबलोलीतील प्रगतशील शेतकरी आणि राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलेले सचिन कारेकर यांच्या प्रसिद्ध गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली या ठिकाणी सर्व विद्यार्थी, मित्र, मैत्रीणी सोबत धमाल मस्ती आणि विविध कार्यक्रम करून स्नेह भोजन करण्यात आले
.या गेट टुगेदर ला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाला आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आणि निवेदक म्हणून प्रमोद गोणबरे यांनी पार पाडली.या संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमंत पवार, राजा सुर्वे,विजय पागडे,प्रमोद पांचाळ,गणेश तोडकरी,आदेश पावरी, श्रद्धा साळवी, शिल्पा काजरोळकर, प्रज्ञा निमूणकर, विशाल जाधव, अनिल साळवी यांचेसह मित्र,मैत्रिणींनी विशेष सहकार्य केले.