गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास डायट चे प्राचार्य सुशील शिवलकर साहेब यांची भेट
गुहागर – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता असलेले गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री सुशीलजी शिवलकर साहेब व अधिव्याख्याता दीपा सावंत मॅडम यांनी भेट दिली.त्यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे, तज्ञ मार्गदर्शक व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सुरू आहे . जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री सुशील शिवलकर साहेब यांनी प्रशिक्षण केंद्रांना भेटी दिल्या व प्रशिक्षणार्थ्यांशी सुसंवाद साधला.त्यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवून भारताचे एका न्याय आणि चैतन्यमय ज्ञानेश समाजात शाश्वतपणे परिवर्तन करण्यात प्रत्यक्षपणे योगदान देणारी अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे हे या राष्ट्रीय धोरणाचे व्हिजन आहे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया मूल्यांकन कार्य नीती राज्य अभ्यासक्रम आराखडा याबाबत प्रभावीपणे विवेचन केले.जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमुलाग्र बदल ,नवनवीन संशोधनाचा विचार करता आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे ही काळाची गरज असून शिक्षकानी शिक्षण क्षेत्रात वाहून घेऊन गुणवत्ता विकासासाठी कार्यरत रहावे ,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणे हे आपले ध्येय असून जागतिक विचार करणारे आणि जगाला दिशा देणारे नागरिक घडावेत यासाठी आपण कटिबद्ध राहायला हवे ,क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन व मूल्यमापन व मूल्यांकन करून प्रशिक्षणाप्रमाणे यापुढे कार्यवाही व्हावी .अतिशय शिस्तबद्ध रीतीने प्रशिक्षण सुरू , असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.